eknath shinde devendra fadnavis ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ekanth Shinde: राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा कुठे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारवर गंभीर आरोप

Prithviraj Chavhan: राज्य सरकारने केवळ निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन निर्णय घेतले आहेत. यामुळे राज्य सरकारला खालावलेल्या आर्थिक स्थितीचा सामना करावा लागत असल्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून होत असलेल्या लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा कुठे आहे, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य आर्थिक अडचणीत सापडलेले असल्याचा आरोप केला आहे.

लोकसभा निवडणुकीत मध्यप्रदेशात काँग्रेसच्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी अ. भा. काँग्रेसने समितीने नियुक्त केलेल्या समितीमध्ये चव्हाण यांचा समावेश आहे. यासंदर्भात ते मध्यप्रदेशात गेले होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘नुकताच राज्य सरकारने एक लाख कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. तसेच ९५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्याही मंजूर करून घेतल्या आहेत. राज्य सरकारची ही आर्थिक स्थिती असताना राज्य सरकारने लाडकी बहीण योजना व युवकांना रोख रक्कम देण्याच्या घोषणा करीत आहे. या योजनांसाठी पैसा कुठून उपलब्ध करणार हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसने यासाठी कायदा करण्याचे सुचविले होते. परंतु राज्य सरकारने केवळ निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन निर्णय घेतले आहेत. यामुळे राज्य सरकारला खालावलेल्या आर्थिक स्थितीचा सामना करावा लागत असल्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

जागावाटपावर चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने किती जागांवर दावा करायचा यावर उद्या, मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. परंतु ही चर्चा बंद दाराआड होईल. तिन्ही पक्षांची आघाडी असल्याने लोकसभेमध्ये जो विजयाचा निकष लावण्यात आला होता. त्याच निकषावर विधानसभा निवडणुकीत जागावाटप होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजप मंदिर लुटारूंसोबत की रामरक्षकांसोबत? नागपूरमध्ये उद्धव ठाकरे गरजले...

Rajapur Waterfalls : पावसाळा सुरू होताच राजापुरातील धबधबे ओसंडले; 'या' 5 धबधब्यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली पोस्ट; नेमकं काय म्हटलं?

ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

Pune News : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

SCROLL FOR NEXT