school fees sakal media
महाराष्ट्र बातम्या

15 टक्के शुल्क कपातीचा जीआर सरकारच्याही अंगलट ?

संजीव भागवत

मुंबई : राज्यातील खाजगी शाळांच्या (private school) शुल्कात 15 टक्के कपात (fee concession) करण्यासाठीचा निर्णय (decision) सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. जे शुल्क कपात करण्याचा जीआर (GR announce) काढण्यात आला, त्याला न्यायालयात आव्हान मिळाल्यास 15 टक्के शुल्क कपातीच वरून पालकांच्या अडचणी (parents problem) वाढणार आहेत. त्यामुळे सरकारनेच (government) कपात केलेले 15 टक्के शुल्क भरावे अशी मागणी आता समोर येत आहे. त्यामुळे शुल्क कपातीचा हा निर्णय सरकारच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानमधील एका प्रकरणात 15 टक्के शुल्क सवलत देण्याचे निर्देश दिले होते, हे निर्देश 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी होते. मात्र या निर्णयाचा चुकीचा आधार घेत शालेय शिक्षण विभागाने सरकारची आणि राज्यातील लाखो पालकांची दिशाभूल केला असल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी ज असोसिएशन (मेस्टा )ने या संघटनेने केला आहे.

15 टक्के शुल्क कपातीच्या जीआरला विरोध करत त्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. शिक्षण विभागाच्या जीआरला न्यायालयात स्टे मिळवण्यासाठी संघटनेने सर्व कायदेशीर बाबी तपासून घेऊनच आम्ही उच्च न्यायालयात गेलो असल्याचे मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या जीआर वारून सरकारचीही मोठी अडचण होणार आहे. संस्थाचालक संघटनानी आम्हाला आणि पालकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 15 टक्के शुल्क कपातीची रक्कम आम्हाला द्यावी, अशी मागणी मेस्टानेही केली आहे.

सरकारने राज्यातील पालकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या शुल्क कपातीची रक्कम ही शाळांना देण्याचा निर्णय घेतल्यास यातून मध्यम मार्ग निघेल, त्यासाठी शिक्षण विभागाच्या जीआर वरून न्यायालयात पुन्हा गोंधळ वाढण्यापेक्षा सरकारने यातून मध्यम मार्ग काढावा अशी मागणी इंडिया वाईड पेरेंट असोसिएशनच्या पदाधिकारी अड. अनुभा सहाय यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT