amit shah, uddhav thakare sakal
महाराष्ट्र बातम्या

नेत्यांची पंचाईत! सोलापूरचे विमानतळ बंदमुळे प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना हेलिकॉप्टरचाच पर्याय; २६ एप्रिलला अमित शहा, ३० एप्रिलला उद्धव ठाकरेंच्या सभेची शक्यता

सोलापूरचे विमानतळ सध्या बंद असून रन-वे, सरंक्षक भिंत, ड्रेनेज लाईन टाकणे अशी कामे सुरू आहेत. कामे पूर्ण व्हायला जुलै उजाडणार आहे. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणाऱ्या व्हीआयपी, व्हीव्हीआयपी नेत्यांना हेलिकॉप्टरनेच यावे लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील होटगी रोडवरील विमानतळ सध्या बंद असून त्याठिकाणी रन-वे, सरंक्षक भिंत, ड्रेनेज लाईन टाकणे अशी कामे सुरू आहेत. कामे पूर्ण व्हायला जुलै उजाडणार असल्याचे विमानतळाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणाऱ्या व्हीआयपी, व्हीव्हीआयपी नेत्यांना हेलिकॉप्टरनेच यावे लागणार आहे. त्यातही रे नगर आणि सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन ठिकाणीच हेलिपॅडची सोय आहे. त्यामुळे प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांना त्यांचे विमान शेजारील जिल्ह्यात उतरवून तेथून हेलिकॉप्टरनेच यावे लागणार आहे.

सोलापूरची विमानसेवा आगामी काही महिन्यांत सुरू होईल, पण तूर्तास याठिकाणी ना विमान ना हेलिकॉप्टर उतरू शकते. धाराशिव जिल्ह्यात एक रन-वे सुरू करण्यात आला आहे. परंतु, त्याठिकाणी मोठे विमान उतरू शकत नाही, केवळ लहान चार्टर विमानच उतरू शकते. त्यामुळे पुणे किंवा कलबुरगी विमानतळावर विमान उतरवून तेथून हेलिकॉप्टरने सोलापुरात प्रचारसभेसाठी व्हीव्हीआयपी नेते येऊ शकतात.

२६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूर शहरात सभेसाठी येतील, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पण त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांना यायचे असल्यास हेलिकॉप्टरचा देखील वापर करता येणार नाही. कारण, सोलापूरमध्ये हेलिपॅटची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे अनेक व्हीआयपी नेत्यांना शेजारील जिल्ह्यात हेलिकॉप्टर उतरवून रस्त्यानेच यावे लागेल अशी स्थिती आहे.

२३ एप्रिल ते ५ मेपर्यंत प्रचारसभा

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी २० एप्रिलला होणार असून २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खऱ्या अर्थाने २३ एप्रिल ते ५ मे या काळात उडणार आहे. भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह महायुतीतील नेत्यांना सभेसाठी आमंत्रित केले आहे. २६ एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर ३० एप्रिलला उद्धव ठाकरे यांची सोलापुरात जाहीर सभा होणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील दहा दिवसांत स्मृती इराणी व योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होतील. दुसरीकडे युवासेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याही सभा होणार आहेत. त्या नेत्यांना हेलिकॉप्टरचाच वापर करून याठिकाणी यावे लागणार आहे हे निश्चित.

होटगी रोड विमानतळावरील सद्य:स्थिती

  • - ड्रेनेज लाइनचे काम अर्धे पूर्ण झाले असून सध्या हे काम ठप्प आहे.

  • - पिण्याच्या पाण्याचे काम पूर्ण झाले, पण कनेक्शन जोडणी झालेली नाही.

  • - विमानतळाच्या संरक्षक भिंतीचे काम सध्या थांबलेले आहे.

  • - विमानतळावरील रन-वेसाठी एकूण तीन थर असतात, त्यातील शेवटचा थर टाकण्याचे काम सुरु आहे.

विमानतळावर ना हेलिकॉप्टर ना विमान उतरू शकणार

होटगी रोड विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने सध्या विविध कामे प्रगतिपथावर आहेत. रन-वेचे काम सध्या सुरू असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत या विमानतळावर ना विमान ना हेलिकॉप्टर उतरू शकते. विमानतळावरील कामे जुलैअखेर संपतील, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT