Dilip Walse Patil
Dilip Walse Patil  ANI
महाराष्ट्र

परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरू : गृहमंत्री

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्यांच्या गैरवर्तवणूक आणि इतर अनियमिततेबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या निलंबनाची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली.

वळसे पाटील म्हणाले की, परमबीर सिंह परतल्यानंतर त्यांनी कोणत्याही पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी वाहनांचा वापर करू नये. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यात आणि सचिन वाझे यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या भेटीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

वाझे-परमबीर सिंह यांच्या भेटीवर चौकशीचे आदेश

खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असलेले परमबीर सिंह अनेक महिन्यांपासून गायब होते. त्यांना कोर्टाने फरार घोषित केलं. यानंतर परमबीर सिंह मुंबईत चंदीवाल आयोगासमोर चौकशीला उपस्थित राहिले. यावेळी वाझेची सुनावणीही पार पडली.

सचिन वाझे मनसुख हिरेन हत्येशी संबंधित असल्याने त्याचीही चंदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे. सुरुवातील दोघांमध्ये काही सेकंद बोलणं झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र, दोघेही तासभर सोबत असल्याची माहिती समोर आली. यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी संबंधित प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. वाझे-सिंह भेटीबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : जवळपास २९४ जिंकूनही NDA टेन्शनमध्ये! हे तीन नेते देणार BJP ला दगा? इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग

Kalyan Loksabha 2024 Election Result: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा झाले खासदार, ठाकरे गटाच्या दरेकर पराभूत

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Lok Sabha Election Results Live : माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील तर हातकणंगलेतून माने 14723 मतांनी विजय; सत्यजीत पाटील-सरुडकर यांचा पराभव

Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : विखेंना मोठा धक्का! नगरकरांनी दिली निलेश लंकेंना दिल्लीत जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी

SCROLL FOR NEXT