political esakal
महाराष्ट्र बातम्या

पुन्हा राज्यपाल-महाआघाडी संघर्ष? मुंबई विद्यापीठ कुलगुरू नेमणूक प्रक्रिया सुरु

आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष होणार असल्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष होणार असल्याची शक्यता

मागील काही दिवसापांसून राज्याच्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. आता आणखी एक बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने बनवलेल्या विद्यापीठ कायद्यकडे दुर्लक्ष करत राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू नेमण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारच्या कायद्यानुसार समिती स्थापन करून त्या समितीकडून कुलगुरुंच्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात येणार आहे. परंतु या कायद्यावर राज्यपालांनी सही केली नाही. याशिवाय दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्यसरकार असा संघर्ष होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा अधिकार एकप्रकारे राज्य सरकारने घेतला असल्याची बातमी समोर आली होती. तरीही राज्यपालांचे अधिकार अबाधित राहतील असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला होता. त्यामुळे विद्यापीठ कुलगुरु नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. राज्य सरकारकडून कुलगुरु पदासाठी दोन नावे राज्यपालांना पाठवली जाणार आहेत. राज्यापालांना त्यातील एक नाव निवडावे लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता राज्यपालांच्या सुरु केलेल्या या प्रक्रियमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Violence: निकालानंतर कोलकात्यात थरार! टीएमसी कार्यालयावर बुलडोझर, रस्त्यांवर भीषण गोंधळ; VIDEO व्हायरल

Summer Breakfast Recipes: थंडाव्याचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल फ्रेश पुदिना पराठा

Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाचा माेठा निर्णय! राज्यात २४ आश्रमशाळांना श्रेणीवाढ, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार..

Nira Canal Accident: नीरा कालव्यात दुर्दैवी घटना; मित्राला वाचवताना दोघे कालव्यात वाहून गेले, एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता, पोहता न आल्याने घात!

६५ वर्षांत २० मुख्यमंत्री बदलले, त्यातील फडणवीस यांनी सोलापूरच्या तरुणांना दिले ‘हे’ गिफ्ट; गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदा सुरु होणार ३ अभ्यासक्रम

SCROLL FOR NEXT