महाराष्ट्र बातम्या

जवानांसाठी ‘भाभा कवच’

मंगेश सौंदाळकर

मुंबई - डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने हलक्‍या वजनाच्या, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बुलेटप्रूफ जॅकेट्‌सची निर्मिती केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या जॅकेट्‌सना ‘भाभा कवच’ असे नाव देण्यात आले आहे. ही जॅकेट्‌स आयात करून आणलेल्या महागड्या जॅकेट्‌सपेक्षा मजबूत असतील.

सध्या जवान वापरत असलेली जॅकेट्‌स दहा किलोपेक्षा अधिक वजनाची आहेत. जड वजनाचे हे जॅकेट घालून सीमेवर दहशतवाद्यांशी दोन हात करताना जवानांना काही अडचणी येतात. हल्ली दहशतवाद्यांनी चिनी बनावटीची, अत्यंत कठीण स्टीलचे आवरण असलेली काडतुसे वापरण्यास सुरवात केली आहे. ती काडतुसे या जॅकेटना छेदून जात असल्याची बाब केंद्रीय गृह विभागाच्या निदर्शनास आली होती. दहशतवादी संघटनांनी काही दिवसांपासून  पोलिस, जवानांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे ‘जैश’च्या दहशतवाद्यांशी लढताना केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच जवान हुतात्मा झाले होते. त्याची गंभीर दखल घेत गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकेट्‌सचे वजन कमी करण्याबाबत अणुऊर्जा विभागाच्या सचिवांशी चर्चा केली.

जॅकेटची वैशिष्ट्ये
 डॉ. किंशूक दासगुप्ता यांच्या चमूने लेव्हल तीनचे एक, लेव्हल तीन प्लसची दोन जॅकेट्‌स तयार केली.
 लेव्हल तीनच्या जॅकेटचे वजन साडेचार किलो तर लेव्हल तीन प्लसच्या जॅकेटचे वजन साडेसहा किलो आहे.
 लेव्हल तीन प्लसचे जॅकेट एके-४७ रायफलच्या गोळ्यांचा तसेच चिनी बनावटीच्या काडतुसांचा मारा रोखू शकते.
 लेव्हल तीन प्लसच्या पुढील भागात बसविण्यात आलेल्या प्लेटमुळे जवानांना गोळीचा सौम्य झटका बसेल.
 जॅकेटचे वजन कमी असल्याने जवानांना गोळीबार करताना अडचणी येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता

माेठी बातमी! 'दिलीप मानेंच्या प्रवेशाला तूर्तास ब्रेक'; राजन पाटील, यशवंत माने, शिंदेंचं ठरलं; बुधवारी भाजप प्रवेश..

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, कधी जाणून घ्या?

Solapur News: आकडे पाहून सगळेच म्हणाले, आँ एवढा पाऊस कधी झाला?; मदतीसाठी बहाद्दरांनी पाडला १९९ मि.मी. पाऊस..

SCROLL FOR NEXT