शिक्षक भरती Google
महाराष्ट्र बातम्या

प्राध्यापक भरतीचे निकष ठरला! शैक्षणिक पात्रता, अध्यापन अनुभव, संशोधनासह ‘या’ बाबींसाठी ७५ गुण तर‌ मुलाखतीसाठी २५ गुण; २१ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

महाराष्ट्र सरकारने प्राध्यापक भरतीत ७५ टक्के गुण शैक्षणिक, अध्यापन आणि संशोधन तर २५ टक्के गुण मुलाखतीसाठी, असा मापदंड निश्चित केला आहे. ७५ पैकी किमान ५० गुण मिळालेला उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी रिक्त पदांसाठी २१ नोव्हेंबरपर्यंत नव्याने अर्ज मागविले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र सरकारने प्राध्यापक भरतीत ७५ टक्के गुण शैक्षणिक, अध्यापन आणि संशोधन तर २५ टक्के गुण मुलाखतीसाठी, असा मापदंड निश्चित केला आहे. ७५ पैकी किमान ५० गुण मिळालेला उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी रिक्त पदांसाठी २१ नोव्हेंबरपर्यंत नव्याने अर्ज मागविले आहेत. अन्य संवैधानिक पदांसाठी ५०-५० गुणांचा निकष असणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलसचिव, अधिष्ठाता व प्राध्यापक अशी आठ पदे भरली जाणार आहेत. यापूर्वी दोनवेळा रिक्त पदभरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या, पण सहा महिन्यांपासून भरती प्रक्रियेला मुहूर्त लागलेला नाही. त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ६ ऑक्टोबर रोजी नवा शासन निर्णय काढला. त्यामुळे विद्यापीठाला रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी लागली आहे.

त्यानुसार पूर्वीच्या जाहिरातीनुसार, ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते आणि त्यात जे उमेदवार पात्र ठरले, त्यांनाही नव्याने अर्ज करावा लागणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नव्या फॉर्म्युल्यानुसार अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुकांना २१ नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाकडे अर्ज करावा लागणार आहे.

भरतीचे नवे निकष अन्‌ उमेदवार चिंतेत; मुलाखतीसाठी जानेवारी उजाडणार

पीएच.डी. (१०० च्या वरील रँकिंगच्या विद्यापीठांमध्ये पीएच.डी. झालेल्यांना गुण नाहीत तर १०० च्या आतील रॅंकिंगच्या विद्यापीठात पीएच.डी. झालेल्यांना गुण आहेत), दीड कोटींचा प्रोजेक्ट, पेटेंट, कन्सल्टन्सी, पब्लिकेशन्स आणि अध्यापनाचा अनुभव, असे भरतीचे नवे निकष आहेत. या निकषांची पूर्तता करून ७५ पैकी किमान ५० गुण मिळविणे कठीण आहे. त्यामुळे नियमित जागांसाठी पात्र शिक्षक मिळणार नाहीत, अशी स्थिती आहे. दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव, जनसंज्ञापन विभाग, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, इतिहास, मानसशास्त्र, जैवतंत्रज्ञान, लाइफ सायन्स या विभागांचे संचालक प्रभारी आहेत. याशिवाय ललितकला व भाषा संकुल (मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, पाली, संस्कृत भाषा) या दोन्ही विभागांचे संचालक प्रभारी असून तेथील प्राध्यापक देखील कंत्राटीच आहेत.

नव्या निकषांनुसार उमेदवारांनी करावेत अर्ज

विद्यापीठांमधील प्राध्यापकांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदभरती शासनाच्या नव्या निर्णयानुसार होत आहे. शिक्षक पदांसाठी ७५-२५ तर संवैधानिक पदांसाठी ५०-५० टक्के गुणांचा नवा निकष आहे. आपले विद्यापीठ सात पदांची भरती करत आहे. त्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत. अर्जांची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाकडून नियुक्त तज्ज्ञांकडून मुलाखती होतील.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : गोंदियात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

SCROLL FOR NEXT