Shankarachary Sakal
महाराष्ट्र बातम्या

हनुमान जन्मस्थळासाठी पुराणाचा दाखला

महाराष्ट्र वि. कर्नाटक संघर्षाचा नवा अध्याय ; अंजनेरीवासिय अन्‌ आखाडा परिषद संतप्त

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर /अंजनेरी (जि. नाशिक) - वाल्मीकी रामायणाच्या आधारे शंकराचार्यांच्या उपस्थितीत किष्किंधा पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा कर्नाटकमधील किष्किंधा हनुमान जन्मस्थळ ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केला. तो ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्री त्र्यंबकेश्‍वरमध्ये. त्यामुळे हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या अंजनेरीमधील ग्रामस्थ आणि आखाडा परिषद संतप्त झालेत. अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्यासंबंधी स्कंद, ब्रह्म, विष्णू पुराण, नवनाथ ग्रंथ, त्र्यंबक माहात्म्य, संत एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण याचा दाखला देण्यात आला आहे. त्यातून सीमावादाबरोबरच महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटकमधील संघर्षाचा नवा अध्याय सुरु झाल्याचे मानले जात आहे.

स्वामी गोविंदानंद सरस्वती यांच्या दाव्यानंतर आज सकाळी अंजनेरी येथील अंजनी माता आणि बाल हनुमान मंदिरात महंत अशोकबाबा, बेझे येथील श्रीराम शक्तीपीठ संस्थानचे पीठाधीश्‍वर स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली. त्यासाठी श्रीनाथनंद सरस्वती, सिद्धेश्‍वरानंद सरस्वती, सुदर्शनानंद सरस्वती, रामानंद सरस्वती, विश्‍वेश्‍वरानंद सरस्वती, शिवानंद सरस्वती आदी उपस्थित होते. श्रद्धेशिवाय साधना होऊ शकत नाही, असे सांगत सिंहस्थ कुंभमेळा भरतो, माता सीतेचे हरण, गौतमी ऋषी आणि अंजनी मातेची तपश्‍चर्या असे संदर्भ असताना हनुमानरायांचा जन्म किष्किंधात कसा होऊ शकतो? असा संतप्त सवाल बैठकीत करण्यात आला.

न्यायालयात जाण्याचा इशारा

हनुमान जन्मस्थळासाठी स्वार्थापोटी दावा केला जात असल्याने स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचा निषेध करण्यात आला. तसेच वेळप्रसंगी पोलिसांमध्ये तक्रार देण्यापासून जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

स्वामी गोविंदानंद सरस्वतींशी चर्चा

स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी नाशिकमध्ये सोमवारी (ता. ३०) शोभायात्रा काढण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी ते किष्किंधाहून हनुमान रथ घेऊन त्र्यंबकेश्‍वरमध्ये आले आहेत. तसेच मंगळवारी (ता. ३१) धर्मसभा घेऊन धर्म मार्तंडांशी चर्चा करण्याची तयारी स्वामींनी दर्शवली आहे. अंजनेरीचे ग्रामस्थ आणि आखाडा परिषदेने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधील स्वामींच्या कार्यक्रमाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT