PUC Certificate

 

Esakal

महाराष्ट्र बातम्या

‘पीयूसी’ तपासणी शुल्कात वाढ! पेट्रोलवरील तीनचाकीचे शुल्क १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवरील वाहनांचे शुल्क १४० रुपये, तर डिझेलवरील वाहनांचे शुल्क १८० रुपये

राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषणाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने १७ ऑगस्टला याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पीयूसी केंद्र चालकांना सुधारित दरानुसार शुल्क आकारावे लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषणाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने १७ ऑगस्टला याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पीयूसी केंद्र चालकांना सुधारित दरानुसार शुल्क आकारावे लागणार आहे.

महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनने पीयूसी शुल्कात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्यातील तसेच अन्य राज्यांतील शुल्काचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने अभ्यास करून अहवाल सादरल्यानंतर सरकारकडे दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. दरम्यान, पीयूसी केंद्र चालकांच्या संघटनेविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान परिवहन विभागाला आदेश प्राप्त झाल्यापासून चार महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सुधारित शुल्कास मंजुरी देण्यात आली आहे.

नव्या दरानुसार दुचाकी वाहनांच्या पीयूसी तपासणी शुल्कात १० रुपयांची वाढ करून ते ५० वरून ६० रुपये करण्यात आले आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांचे शुल्क १०० वरून १२० रुपये, पेट्रोल, सीएनजी व एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांचे शुल्क १२५ वरून १४० रुपये, तर डिझेल वाहनांचे शुल्क १४० वरून १८० रुपये करण्यात आले आहे.

वाहन प्रकारनिहाय शुल्क

  • वाहन प्रकार सध्याचे शुल्क सुधारित शुल्क

  • दुचाकी वाहन ५० ६०

  • पेट्रोलवरील तीनचाकी वाहन १०० १२०

  • पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवरील वाहन १२५ १४०

  • डिझेल वाहन १४० १८०

जादा शुल्क आकारल्यास कारवाई

परिवहन विभागाने सर्व वायुप्रदूषण तपासणी केंद्रांच्या मालकांना सुधारित दरांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राच्या दर्शनी भागात सुधारित शुल्काचा फलक ठळकपणे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. डिझेल वाहनांच्या पीयूसी तपासणी शुल्कात सर्वाधिक ४० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १४० रुपयांचे शुल्क आता १८० रुपये होणार आहे. पेट्रोल, सीएनजी व एलपीजी वाहनांच्या शुल्कात १५ रुपये, तर दुचाकी वाहनांच्या शुल्कात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axis Bank Credit Card वापरता? नवे नियम लागू होणार; कधीपासून आणि कोणते? जाणून घ्या...

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Marathi News Updates : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT