Puja Khedkar parents divorce centre asks pune police about their marital status  
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या घटस्फोटातही घोळ; केंद्राने पुणे पोलिसांकडे मागितली माहिती

Puja Khedkar parents divorce Latest News : पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण तीन जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झाले होते.

रोहित कणसे

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत. आता केंद्र सरकारने पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या वैवाहिक स्थिती बद्दल रिपोर्ट मागवला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी आपले आई-वडील वेगळे झ्याचा दावा करत यूपीएससी परीक्षेत चुकीच्या पद्धतीने ओबीसी नॉन क्रिमीलेयरचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर केंद्राने हे निर्देश दिले आहेत आहेत.

पूजा खेडकर यांना मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पूजा खेडकर यांना मंगळवारपर्यंत चौकशीसाठी येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या चौकशीआधीच पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकर यांच्याविरोधात युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच पूजा खेडकर यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच युपीएससीने तुमची उमेदवारी रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील खेडकर यांना पाठवली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण तीन जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झाले होते. मात्र या काळात पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावत महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. याबाबत वाद झाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची तत्काळ वाशीम येथे बदली झाली होती. वाशीममध्ये दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता, नंतर त्याला देखील स्थगिती देण्यात आली .

खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणे यामुळे प्रशिक्षणावर असलेल्या पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप झाला, त्याबाबत चौकशी सुरू होती. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली होती.

पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याचा आरोप आहे. तसेच त्यांची आणि त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी नॉन क्रिमी लेअरचे प्रमाणपत्र काढल्याचे समोर आले होते. खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून सुरूवातीला दोन दिव्यांग प्रमाणपत्र काढली होती. नंतर त्या दोन्ही अपंग प्रमाणपत्रांचे एकत्रिकरण करून एकच प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यामध्ये पूजा खेडकर या ५१ टक्के अपंग असल्याचे नमूद करण्यात आले असल्याचीही माहिती देखील समोर आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT