IFTDA
IFTDA 
महाराष्ट्र

पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी!

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय इंडियन फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन डायरेक्‍टर्स असोसिएशनने (आयएफटीडीए) जाहीर केला. तसेच, पंजाबचे सांस्कृतिकमंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय या संघटनेने घेतला आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दादासाहेब फाळके चित्रनगरी बंद ठेवण्यात आली होती. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण दोन तास बंद ठेवले. क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सुरेश रैना, माजी क्रिकेटपटू महंमद कैफ यांनीही जाहिरातींचे चित्रीकरण बंद ठेवून आदरांजली सभेत सहभाग घेतला.

सिद्धू यांची सोनी वाहिनीने "द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर आता संघटनेनेही त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी कलाकार, गायक असलेला एकही चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष, सिनेनिर्माता अशोक पंडित यांनी दिला. आदरांजली सभेसाठी चित्रनगरी दुपारी 2 ते 4 या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशी शपथ या वेळी घेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT