Pune Accident esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Accident : प्रवासी गाढ झोपेत, एकदम धडाम आवाज अन् मग किंकाळ्या... हृदयद्रावक घटना...!

पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

धनश्री भावसार-बगाडे

जुन्या पुणे-मुंबई महामार्गाव खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस थेट दरीत कोसळली आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात सुरुवातीला ७ ते ८ लोकांचा मृत्यू झाल्याचे समजले.

साधारण अंदाजे ४० ते ४८ प्रवाशांची ही बस होती. मिळालेल्या माहितीनुसार यात सुमारे १३ लोकांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
एक खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण असून त्यात अंदाजे २५ लोक जखमी झाले. प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बस दरीत कोसळल्याच्या आवाजाने आणि बसलेल्या झटक्याने काही भानावर आले अन् पहाटेच्या अंधारात किंकाळ्या घूमू लागल्या.
आता इथे रेक्यू ऑपरेशन सुरू आहे. लोणावळ्याजवळ बोरघाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला.
जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत. बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. अपघातातील जखमींना बाहेर काढलं जात आहे. रात्रीचा अंधार असल्याने या बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, उजाडताच या मदतकार्याच्या कामास वेग आला आहे. क्रेन मागवून बस बाजूला केली जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT