Pune Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Crime: प्रेयसीचा खून केलेल्या 'त्या' प्रियकराची मुळशी डॅमजवळ आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुण्याच्या औंधमधील २२ वर्षीय तरुणीचा एका तरुणाने खून केल्यानंतर आज त्या तरुणाने मुळशी डॅमजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

श्वेता रानवडे व प्रतिक ढमाले (२५ वर्षे) याचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु प्रतिकचे वर्तन चांगले नसल्याने श्वेताने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडून प्रतिकने श्वेताच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केला. या कृत्यानंतर संशयित प्रतिक पळून गेला त्याच्या शोधासाठी चतुःश्रृंगी पोलिसांची पथके रवाना झाली होती.

आज प्रतिक ढमाले या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. मुळशी 'टाटा डॅम'जवळ त्याने आत्महत्या केली. हे दोघेही नात्यातले असल्याची माहिती आहे. या घटनेने औंध परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT