ajit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 145 चा आकडा राजकीय पक्ष स्वतःच्या ताकदीवर मिळवू शकत नाही

'राजकारणामध्ये आकड्यांची जुळवाजुळव महत्वाची आहे. 145 हा आकडा राजकीय पक्षा स्वतःच्या ताकदीवर मिळवू शकत नाही.

सकाळ वृत्तसेवा

'राजकारणामध्ये आकड्यांची जुळवाजुळव महत्वाची आहे. 145 हा आकडा राजकीय पक्षा स्वतःच्या ताकदीवर मिळवू शकत नाही.

पुणे - 'राजकारणामध्ये आकड्यांची जुळवाजुळव महत्वाची आहे. 145 हा आकडा राजकीय पक्षा स्वतःच्या ताकदीवर मिळवू शकत नाही. राष्ट्रवादीचा नेता नेहमीच निवडणुकीतुन ठरला आहे, पक्षातील आमचे सर्व निर्णय हे शरद पवार हेच पक्षातील सर्व निर्णय घेतात.'' असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या "मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच' या विधानावर पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

खराडी येथील क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठानच्यावतीने कबड्डी स्पर्धेच्या बक्षिस वितरणाला पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी कराड येथील कार्यक्रमात पुढे राष्ट्रावादीचाच मुख्यमंत्री होईल, असे विधान केले होते. त्यावर पवार यांनी "जयंतराव पाटील यांच्या तोंडात साखर पडो'अशी टिपण्णी करीत आपली भुमिका मांडली. ते म्हणाले, 'निवडणुकांना सामोरे जाणे आणि तिथे सर्वाधिक जागा कशा निवडून येतील हा आमचा प्रयत्न असेल.

राजकारणात आकड्यांची जुळवाजुळव महत्वाची असते. 145 हा आकडा राजकीय पक्ष स्वतःच्या ताकदीवर मिळवू शकत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नेता नेहमी निवडणुकीतुन ठरला आहे. असा कुठलाही निर्णय शरद पवार यांनी घेतलेला नाही. पवार यांनी 22 वर्षात नेता निवडण्यासाठी लोकशाही पद्धत वापरली आहे.'

बावनकुळे यांच्यावर टिका

बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला पवार यांनी उत्तर दिले. 'नागपुरला जाऊन बावनकुळे यांची भेट घेतो. काय आणि कसे काम करावे लागते, काम केल्यावर आपला पक्ष आपल्याला कसे तिकीट देतो, काम न केल्यास पक्ष बायकोलाही तिकीट कसे नाकारतो, या सगळ्यांची बावनकुळे यांच्याकडून चांगली माहिती घेतो,' अशा शब्दात त्यांनी बावनकुळेंवर टिपण्णी केली.

आधी पुस्तकाचे प्रकाशन तरी होऊ द्या !

शरद पवार यांच्या "लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या पुढील भागाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून बऱ्याच घटनांवर ऊहापोह करण्यात आला आहे. याबाबत पवार यांना प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी, 'आधी पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, मग जनतेला ते कळू द्या, त्यानंतर मत मांडू.' असे उत्तर दिले.

वेताळ टेकडीबाबत घाईगडबड करुन चालणार नाही

वेताळ टेकडी बचाव कृती समितीमधील नागरीकांनी आपली भेट घेतली. त्यांना 1 मे रोजीचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचे सादरीकरण आपण पाहू. त्यानंतर या कामाशी संबंध असलेल्या सर्व विभागांची बैठक घेऊन पुणेकरांशी चर्चा करु. वेताळटेकडीबाबत घाईगडबड करुन चालणार नाही. पुणेकर उगाचच इतक्‍या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणारे नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT