Ajit Pawar News
Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र

Ajit Pawar : पुण्यात हे असलं खपवून घेणार नाही; अजित पवारांनी भाजपच्या मंत्र्याला फटकारलं

सकाळ डिजिटल टीम

पुणेः विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. पवारांनी विविध प्रश्नांची उत्तरं यावेळी दिली. यादरम्यान भाजपच्या मंत्र्यालाच अजित पवरांनी फटकारलं. पुण्यात हे असलं खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कसबा आणि चिंचवड निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले...

आज केसरी वाड्यामध्ये भाजपच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मेळाव्याला आजारी असतांनाही गिरीश बापट यांची उपस्थिती होती. बापट ऑक्सिजन ट्यूब लावून व्हीलचेअरवर उपस्थित होते. त्याबद्दल बोलतांना अजित पवार म्हणाले की, काल भाजपचे नेते त्यांना भेटले, त्यांचे नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांनी बापट यांना सांगितले की, कसबामध्ये काळजीचे वातावरण आहे. त्यामुळे आजारी जरी असले तरी त्यांनी मेळावा केला.

चिंचवड मतदारसंघातल्या वंचित आघाडीच्या भूमिकेबद्दल पवार म्हणाले, वंचितची युती शिवसेनेशी झाली आहे, आघाडीशी नाही. वंचित आघाडीचे अध्यक्ष आणि टीमने ठराव केला आहे की आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. आता ते ठराव पाठवतील आणि निर्णय घेतील.

गिरीश महाजन यांना इशारा

दरम्यान, गिरीश महाजन प्रचारामध्ये एका आरोपीसोबत दिसले होते. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, हे अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. मंत्री असे वागत असतील, गुंड प्रवृत्तीला घेऊन दहशत निर्माण केली जात असेल तर इथल्या आयुक्तांनी नोंद घेतली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीचे वागत असतील तर पुण्यात हे खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

मनसेच्या पाठिंब्याबाबत बोलतांना अजित पवार म्हणाले की, मनसे सारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिलं म्हणजे आमचे धाबं दणाणले, अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली.

रुपाली ठोंबरेंकडून गिरीश महाजनांवर टीका

पुण्यातील संदीप मोहोळ खून प्रकरणात ज्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यापैकी संतोष लांडे हा सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याच्यावर याआधी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. या संतोष लांडेने तो गिरीश महाजनांसोबत प्रचार करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे. मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT