ajit pawar Sakal media
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Video : अजित पवारांकडून सावित्रीबाईंचा चुकीचा उल्लेख; भाजपच्या तुषार भोसलेंचं ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी बोलण्याच्या ओघात सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा चुकीचा उच्चार केला. हाच मुद्दा धरुन भाजपचे तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्या माफीची मागणी केली आहे.

व्हीडिओमध्ये अजित पवार हे सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख सावित्रीबाई होळकर करत आहेत. त्यानंतर त्यांनी ती चूक सुधारली. बोलण्याच्या ओघात पवार तसं बोलल्याचं दिसून येतंय.

परंतु हाच मुद्दा धरुन भाजपचे तुषार भोसले यांनी त्यांच्या 'आचार्य तुषार भोसले' या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. अजित पवारांचा तो व्हीडिओ जोडून त्यासोबत ''ओ वाचाळवीर अजित पवार काय हे ? क्रांतीज्योती सावित्रीमाईंचा असा अपमान? आतातरी माफी मागणार की ठामच राहणार मग्रूर'' असं ट्विट केलं आहे.

यासंदर्भातील वृत्त 'टीव्ही ९' ने दिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अजितदादांकडून जर आडनाव चुकलं असेल तर तिळपापड व्हायची गरज काय? तू वारकरी तरी आहेस का? कुठलं लक्षण आहे तुझ्याकडे वारकऱ्याचं? तुला कोणत्या मठातून लाथ मारून हाकललं, हे माहिती आहे'' असं मिटकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT