Pune Auto Rickshaw esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Auto Rickshaw: बघतोय रिक्षावाला... अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणेः बाईक टॅक्सीविरोधामध्ये पुण्यातील रिक्षा चालकांनी बेमूदत आंदोलन पुकारलं होतं. परंतु प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र आता आंदोलक रिक्षाचालकांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येतंय.

'बघतोय रिक्षावाला' या संघटनेसह अनेक संघटना रिक्षा बंदच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. काल संघटनांनी हे आंदोलन मागे घेतलं. ‘बघतोय रिक्षावाला’संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी बेकायदेशीरपणे टॅक्सी चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचं सांगितलं. आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसमोर तशी याबद्दल घोषणा केली. यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर येत्या १० दिवसात पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात येईल. या समितीत जिल्हाधिकारी यांच्यासह आरटीओचे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिस विभागाचे अधिकारी असतील. या समितीकडून येत्या १० दिवसात बेकायदा बाईक टॅक्सीवर कडक कारवाई केली जाणार आहे.

परंतु आता आंदोलनामध्ये सहभागी २ हजार ५०० रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल झाले आहे. विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, यामध्ये केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकूश यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतुकीस अडथळा, नियमभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. काल पुण्यामध्ये हजारे रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयासमोर हे आंदोलन केलं होतं. कलम ३४१नुसार अडीच हजार रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam: ''बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय'' शरद पवारांचे शब्द; त्यांनाही 'मातोश्री'वर रोखलं होतं!

आईशिवाय वाढलेली तू... सायलीचा अपमान होताच भडकणार प्रतिमा; प्रियाच्या कानशिलात लगावणार, आजच्या भागात काय घडणार?

Mystery of Umoja Village : 'या' गावात पुरुषांना आहे प्रवेशबंदी, तरीही महिला होतात गर्भवती; काय आहे गूढ जाणून घ्या....

Stock Market Closing: शेअर बाजाराने घेतला यू-टर्न; सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

Mumbai Metro Aqua Line: मुंबईमध्ये धावत्या भूमिगत मेट्रोत उडाल्या ठिणग्या; प्रवाशांत घबराट अन्...

SCROLL FOR NEXT