SSC-HSC Exam

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

पुणे बोर्डाचे आदेश! ‘सीसीटीव्ही’मुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांची नाही सरमिसळ; पण, ‘या’ परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांची होणार आदलाबदल

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्या, यासाठी आता प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे केंद्रांवरील पर्यवेक्षकांची सरमिसळ असणार नाही. मात्र, सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्या, यासाठी आता प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे केंद्रांवरील पर्यवेक्षकांची सरमिसळ असणार नाही. मात्र, सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १८८ परीक्षा केंद्रे असणार आहेत. तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात १२० केंद्रे आहेत. १८ मार्चपर्यंत दोन्ही वर्गांची परीक्षा पार पडणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी आवश्यक त्या केंद्रांवर ड्रोनचा वापर केला जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक असणार आहे. भरारी पथकांना जिल्ह्यातील बहुतेक केंद्रांना भेटी द्याव्या लागणार आहेत.

गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त केंद्रांवर असणार आहे. एवढी यंत्रणा लावूनही ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार होतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. दरम्यान, दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी उद्या (सोमवारी) माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे बोर्डाच्या आदेशानुसार भरारी पथकांची नियुक्ती करणार आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले पत्र

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार दहावी-बारावीच्या वार्षिक परीक्षांचे संपूर्ण नियोजन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. प्रात्यक्षिक परीक्षेच्या पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकाऱ्यांची भरारी पथके नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश निघाले आहेत. बोर्डाच्या निर्णयानुसार सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रावरील पर्यवेक्षकांची अदलाबदल होणार आहे. कॅमेरे असलेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षकांची सरमिसळ केली जाणार नाही.

- औदुंबर उकिरडे, विभागीय अध्यक्ष, पुणे

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारीपासून

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षेला सुरवात होईल. तत्पूर्वी, २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा संपणार आहे. २० फेब्रुवारीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेला सुरवात होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी यंदा पहिल्यांदाच भरारी पथके अचानक शाळांना भेटी देणार असून तसे आदेश बोर्डाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

SCROLL FOR NEXT