CM Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

राजकीय गोंधळात शिंदेंचा सर्वपक्षीय नेत्यांना फोन; काय आहे कारण?

भाजप-शिंदे गटात ताळमेळ नाही.

सकाळ डिजिटल टीम

पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या राजकीय गोंधळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे.

पुण्यातील पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही निवडणुक बिनविरोध होणार नाही. असे स्पष्ट केलं आहे.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, महाविकास आघाडीनेही त्यांच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहे.

याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र या सर्वाला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. पुण्यातील पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विविध पक्षांतील नेत्यांना फोन केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीचे बिहार कनेक्शन; मास्टरमाईंडच्या पत्नीला पाटण्यातून अटक

Lonavala Heavy Rain : चोवीस तासांत १३१ मिमी पाऊस; लोणावळ्यात जोरदार पावसाने सखल भाग जलमय

FIFA World Cup 2026 : पैशाने नाही विकत घेता येत गुणवत्ता; वर्ल्डकप फुटबॉलमधील सौदी, कतारच्या अपयशानंतर अधोरेखित

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी ४ वाजता सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT