महाराष्ट्र बातम्या

Pune Accident : कंटेनर-ट्रकचा भीषण अपघात; आगीत चौघांचा जळून मृत्यू , नवले ब्रिज परिसरातील घटना

विठ्ठल तांबे

पुणे/धायरी : मुंबई-बंगळूर महामार्गावर कंटेनरने ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे ट्रकला लागलेल्या भीषण आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरूष आणि एका महिलेसह मुलाचा समावेश आहे. तर, अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिरासमोर सोमवारी (ता. १६) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये ट्रकचालक गोविंद तुकाराम जाधव (वय ३२) आणि क्लीनर सोमनाथ कल्लाप्पा नीळे (वय ४५, रा. वळसंग, ता. जत, जि. सांगली) यांचा समावेश आहे. पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मका भरडा पोती घेऊन मालवाहू ट्रक विटा-सांगली येथून गुजरातकडे निघाला होता.

नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर परिसरात कंटेनरने ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे ट्रकला लागलेल्या आगीत ट्रकच्या केबिनमधील चारजणांचा होरपळून मृत्यू झाला. ट्रकमधील सहा जणांपैकी दोन जण बचावले. त्यांना उपचारासाठी काशीबाई नवले रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागविली. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

दरम्यान, महामार्गावर अपघातामुळे एकेरी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अवजड वाहनांच्या रांगा लांबवर लागल्या आहेत. पुणे पोलिस, पीएमआरडीए, अग्निशमन सेवा आणि इतर यंत्रणांसह महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सध्या पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. जखमी प्रवाशांच्या जबाबाच्या आधारे पोलिस तपास करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन आणि सिंहगड वाहतूक विभाग, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग मोरे, प्रशांत कणसे आणि पोलिस कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग गस्त पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT