Rashmi Sukla Phone Tapping Case  sakal
महाराष्ट्र बातम्या

Rashmi Sukla : फडणवीसांना धक्का! रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

सकाळ डिजिटल टीम

Rashmi Sukla Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप शुक्ला यांच्यावर होता. या प्रकरणात पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. रश्मी शुक्ला या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याबद्दल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला आहे. त्यामुळे माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार आहेत.

हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या रश्मी शुक्ला यांनी काही आमदार, मंत्र्यांचे फोन टॅप केले होते. तसेच यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास देखील झाला. मात्र या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही. यानंतर रश्मी शुक्ला यांनी पोलिस विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली. तसेच यासंदर्भात पुणे न्यायालयात दाखल करण्यात आला होता, जो न्यायालयाने फेटाळला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तसेच त्यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ यांची देखील भेट घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. रश्मी शुक्ला यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून हे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते. यामुळे आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा धक्का असून यामुळे सरकरच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण! दहा दिवसांत सोने ७,४००, तर चांदी १५,९०० रुपयांनी स्वस्त

Pimpri Chinchwad politics : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांची निवड कशी होणार? विधानसभानिहाय सूत्राची चर्चा

SCROLL FOR NEXT