Pune Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Crime News : पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

पुणेः परवा पुण्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची धक्कादायक घडली घडली होती. आता पुन्हा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान झिंदाबादचे नारे लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील कोंढवा भागात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दोघांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले. दोन्ही आरोपी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, पुण्यात एका म्युझिकल कॉन्सर्टमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान करणारी घटना समोर आली होती. गायिकेनं तिरंगा झेंडा प्रेक्षकांमध्ये भिरकावल्यानं हा अवमान घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी संबंधित गायिकेवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली होती.

तिच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर अॅड. अशुतोष भोसले यांनी मुंढवा पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ज्या बँडकडून या म्युझिकल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या 'शांती पिपल' बँडसह गायिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT