water tanker sakal
महाराष्ट्र बातम्या

Water Tanker : पुणे विभागातील तीन जिल्हे टॅंकरमुक्त; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर सुरू

सध्या पुणे जिल्ह्यातील तेरापैकी आंबेगाव, भोर, खेड, जुन्नर या चारच तालुक्यात टॅंकर सुरु आहेत. उर्वरित १३ तालुके अद्यापही टँकरमुक्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सध्या पुणे जिल्ह्यातील तेरापैकी आंबेगाव, भोर, खेड, जुन्नर या चारच तालुक्यात टॅंकर सुरु आहेत. उर्वरित १३ तालुके अद्यापही टँकरमुक्त आहेत.

पुणे - पुणे विभागातील पाचपैकी कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधील एकाही गावांना अद्यापपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे आतापर्यंत हे तीनही जिल्हे टँकरमुक्त आहेत.

सध्या पुणे विभागातील पुणे व सातारा या दोनच जिल्ह्यात २९ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यापैकी सर्वाधिक २२ टँकर हे पुणे जिल्ह्यात सुरु झाले आहेत. या टँकरच्या माध्यमातून विभागातील ३९ गावे १६६ वाड्यांमधील ६२ हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातील तेरापैकी आंबेगाव, भोर, खेड, जुन्नर या चारच तालुक्यात टॅंकर सुरु आहेत. उर्वरित १३ तालुके अद्यापही टँकरमुक्त आहेत. जिल्ह्यातील अद्यापपर्यंत टँकरमुक्त असलेल्या नऊ तालुक्यांमध्ये दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर आदी तालुक्यांसह मावळ, मुळशी, हवेली, वेल्हे या तालुक्यांचा समावेश आहे.

सध्या टँकर सुरु असलेल्या चार तालुक्यांमधील ३१ गावे आणि १४६ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ही आंबेगाव तालुक्याला बसली आहे. या तालुक्यातील ८ गावे आणि ४४ वाड्यांना ०९ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

सद्यःस्थितीत पुणे विभागातील ६२ हजार ५८२ इतकी लोकसंख्या ही पाण्याअभावी तहानलेली आहे. या सर्व लोकसंख्येला २९ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. हे सर्व टॅंकर फक्त पुणे आणि सातारा या दोनच जिल्ह्यात सुरु आहेत. पुणे विभागातील एकूण टॅंकरपैकी १२ सरकारी आणि १७ खासगी टॅंकर आहेत. या गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ३२ खासगी विहीरी व विंधनविहिरींचे अधिगृहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT