Bhagat Singh Koshyari chhatrapati shivaji maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhagat Singh Koshyari: राजभवनाबाहेर एकवटले माजी महापौर; हातात झळकले पोस्टर्स

सकाळ डिजिटल टीम

पुणेः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात आंदोलनं होत आहेत. त्यातच आता पुण्यातील माजी महापौरांनी एकत्र येत एक अनोखं आंदोलन केलं आहे.

पुण्यातील राजभवनाबाहेर महापौरांनी हातामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाचे पोस्टर्स घेऊन धरणे आंदोलन केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १५ माजी महापौर आंदोलनामध्ये सहभागी झाले. भाजपचे केवळ एक महापौर दत्ता गायकवाड आंदोलनस्थळी दिसून आले.

हेही वाचाः First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

या आंदोलनामध्ये मुरलीधर मोहोळ आणि मुक्ता टिळक यांचा सहभाग नव्हता. यावेळी आदोलकांनी राज्यपालांना जेलमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे. माजी महापौरांच्या या धरणे आंदोलनाने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनीदेखील शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं लाड म्हणाले. त्यानंतरही पुन्हा सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. लाड यांनी त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT