pune news esakal
महाराष्ट्र बातम्या

Mango News : पुण्यात आता हप्त्यावर आंबा; बारा महिन्यांचा EMI करा अन् आंब्याची पेटी घेऊन जा!

संतोष कानडे

पुणेः पुण्यामध्ये एका व्यावसायिकाने भन्नाड आयडिया केली आहे. त्यांच्याकडे EMI वर आंब्याची पेटी मिळणार आहे. सामान्य माणूस महागडे आंबे खरेदी करु शकत नाही, त्यामुळे ही कल्पना एका पुणेकराने पुढे आणलीय.

पुण्यातील गुरुकृपा ट्रेडर्सचे गौरव सनस यांच्या डोक्यातून ही कल्पना पुढे आली आहे. 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी एक याबाबतचा एक व्हीडिओ करुन फेसबुकवर शेअर केला आहे. यावेळी गौरव सनस यांनी बोलतांना हा भारतातला पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला आहे. नैसर्गिकरित्या पिकवलेला देवगड हापूस ईएमआयवर मिळेल, असं ते म्हणाले.

हेही वाचाः शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

गौरव सनस हे EMI वर हापूस आंबा विकत आहेत. त्यांनी पेटीएमशी करार केला आहे. बारा वर्षांपासून आंबे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गौरव सनस यांचे पुण्यातील सनसिटी रोड येथील आनंद नगर परिसरात चॉकलेट आणि फटाके विक्रीचे दुकान आहे. या वर्षांपासून त्यांनी दुकानात ईएमआयवर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन ग्राहकांनी त्यांच्याकडून प्रत्येकी 30 हजार रुपये किमतीचे आंबे विकत घेतले असून या दोघांनाही वर्षभरासाठी दरमहा 2500 रुपये हप्ता पडेल.

'लोक ईएमआयवर मोबाईल घेतात. त्यामुळे महागडी वस्तू सहजासहजी विकत घेता येते. असाच आंबाही विकत घेता येईल, अशी कल्पना मला सुचली. पाच हजाराचीही पेटी घेतली तरी आठ महिने किंवा बारा महिन्यांच्या ईएमआयवर ते पैसे फेडता येतात, असं गौरव यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT