Cold
Cold 
महाराष्ट्र

पुण्यात कडाका कमी; विदर्भात मात्र हुडहुडी

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात थंडीचा कडाका अंशतः कमी झाला असला तरीही विदर्भात हुडहुडी भरत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे ७.४ अंश सेल्सिअस नोंदले तर, पुण्यातील किमान तापमान ३.३ ने वाढून १३.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह काही प्रमाणात सुरू झाले आहे. यामुळे विदर्भातील काही भागांत थंडीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी-अधिक स्वरूपात आहे. राज्याच्या काही भागात वर्षाच्या अखेरीस थंडीत वाढ होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गोंदियामध्ये किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. अवघ्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील थंडीचा कडाका वाढला. त्यामुळे गोंदियात किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी झाले. तेथे ७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागांत थंडी आहे. मराठवाड्यातही गारठा कायम आहे. यामुळे किमान तापमान १० ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, नाशिक, जळगाव भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जात आहे. तेथे किमान तापमान ८ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT