Jayant Patil  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Election: पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले...

गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुण्यातील खासदारकीची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपकडून बापट कुटुंबांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे.

तर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक लॉबिंग भाजपमध्येच सुरू असल्याचं दिसुन येत आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेमध्ये आहेत. त्यात माजी खासदारांचाही समावेश आहे. तर बापट यांच्या सूनेच्या नावाचीही चर्चा आहे. तर काँग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याबाबत जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी अशी पक्षातून मागणी आहे. यावर आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करु, असे लोकसभा पोटनिवडवणुकीच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा दर्जा गेला आहे, त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, देशातील वेगवेगळ्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. त्यानंतर काही पक्षांबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. परंतु आगामी निवडणुकांमध्ये पक्ष चांगली कामगिरी करेल अन् पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कर्नाटक आणि इतर राज्यातील निवडणूकांमध्ये आम्ही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा सहज मिळवू. हा पक्षासाठी सेटबॅक नाही. कारण राज्यात पक्षाचे घड्याळ हे चिन्ह कायम आहे, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT