Fastag esakal
महाराष्ट्र बातम्या

Fastag: गाडी पार्किंगमध्ये... टोल वसुली मात्र सुरु; काय आहे प्रकार?

सकाळ डिजिटल टीम

पुणेः तुमची गाडी एकाजागी उभी असेल आणि तुम्हाला फास्टटॅगद्वारे पैसे कापल्याचे मेसेज येत असतील तर? अशीच संताप आणणारी घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे या कार मालकाची गाडी घराच्या पार्किंगमध्ये उभी होती.

पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्याच्याबाबत हा प्रकार घडला आहे. मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले सुरेश परदेशी यांची गाडी पार्किंगमध्ये उभी असतांनाही त्यांच्यावर ही 'टोल'धाड पडलीय. सोलापूर रोडवरील तीन टोलनाक्यांवर टोल कापल्याचा हा प्रकार घडला.

''कुटुंबासोबत दिवाळी साजरी करीत असतांना माझी गाडी पु्ण्यातील घरात होती. २७ ऑक्टोबरला कार्यालयात आल्यावर मोबाईलवर पाटस टोल नाक्यावर ८५ रुपये टोल कटल्याचा मेसेज आला'' असं परदेशी यांनी सांगितलं.

"मी माझ्या पत्नीला गाडी चोरीला गेली आहे का म्हणून पार्किंगमध्ये बघायला सांगितलं. तिने गाडी पार्किंगमध्येच असल्याचे सांगितले. या दरम्यान सरडेवाडी टोलनाक्यावर ८५ रुपये कट झाल्याचा मेसेज आला. काही वेळाने पुन्हा वरवडे टोल नाक्यावरील ७० रुपयांची पावतीचा मेसेज मला आला. मी तात्काळ बँकेला सांगून माझे अकाउंट ब्लॉक करायला सांगितले."

परदेशी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना देखील याबाबत पत्र लिहले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan IMD Alert : १५० किमी वेगाने धडकणार महाकाय चक्रीवादळ! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, 'या' राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट; महाराष्ट्रात काय होणार परिणाम?

India US AI Security Pact: AI सुरक्षेसाठी भारत-अमेरिकेसह 10 देश एकत्र; चीनच्या तंत्रज्ञान वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी नवा करार

FDA Action: संशयास्पद उत्पादनांवर 'एफडीए'चे छापे, मान्यता नसलेल्या घटकांचा वापर; राज्यभरात कारवाई

Latest Marathi News Update : अमित शाहांच्या स्वागतासाठी पुण्यात बॅनरबाजी; भाजपपेक्षा शिंदेसेनेच्या बॅनर्सचीच जास्त चर्चा

Takari Irrigation Scheme : दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'ताकारी' आणि 'म्हैसाळ' सिंचन योजनांचे पंप सुरू; आता थेट जतसह 'या' तालुक्यांना मिळणार पाणी

SCROLL FOR NEXT