monsoon in kerala sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon : मॉन्सून पुढील ४८ तासात केरळात दाखल होण्याची शक्यता

यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) केरळात दाखल होण्याची वेळ लांबली आहे.

अक्षता पवार

पुणे - यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) केरळात दाखल होण्याची वेळ लांबली आहे. दरम्यान मॉन्सूनच्या वाटचालीस आता वेग आला असून पुढील ४८ तासांमध्ये ते केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

दीर्घकालीन आगमनाची स्थिती पाहता साधारणपणे मॉन्सून हा १ जून पर्यंत केरळमध्ये दाखल होतो. हवामानशास्त्र विभागाने १६ मे रोजी मॉन्सूनचा अंदाज जाहीर केला होता. त्या अंदाजानुसार यंदा ४ जून पर्यंत मॉन्सून केरळात येणार होते. त्यामुळे मॉन्सूनच्या आगमनाला विलंब होणार असल्याचे समजत होते. प्रत्यक्षात मात्र त्यास आणखीन थोडा विलंब झाला आहे.

सध्या अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले. त्यामुळे केरळमध्ये मॉन्सूनला दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ९) मॉन्सून केरळ मध्ये पोहचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हळूहळू देशात मॉन्सूनचा प्रवास सुरू होईल. असे हवामानशास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी सांगितले.

मॉन्सूनची स्थिती :

सध्या मॉन्सूनने लक्षद्वीप बेट येथील काही भाग, दक्षिण श्रीलंकासह कोमोरीन येथे प्रगतील केली आहे. त्यात दक्षिण अरबी समुद्रात पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे वाढते प्रवाह तसेच अरबी समुद्रातील 'बिपरजॉय' चक्रीवादळाची वाटचाल पाहता मॉन्सून पुढे प्रगती करण्यासाठी पोषक स्थिती झाली आहे.

पुढील ४८ तासांत मॉन्सून दक्षिण अरबी समुद्राचे आणखी काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागराचा आणखी काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग व्यापनार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT