नवी दिल्ली : कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. त्यावेळी महाराष्ट्राला कोविडचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील.असे हर्षवर्धन यांनी सांगितले. खासदार बापट यांनी नवी दिल्ली येथे आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बापट म्हणाले, "आज म्हणजे आठ एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यात सुमारे साडेदहा हजार कोविडचे रुग्ण सापडले. ही संख्या चिंताजनक असून, महाराष्ट्रातील आजची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रतिबंधक लस देण्याची मोहीम अधिक गतिमान करावी. तसेच रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवण्यासाठी मदत करावी, असे निवेदन आज केन्द्रीय आरोग्य मंत्री यांना दिले. पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. तथापि शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख वायल्स इतकी लस गरजेची आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने. या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.
- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील अशा 215 खाजगी रुग्णालयात लसीकरण करता येईल. त्या रुग्णालयाची यादीही आम्ही सादर केली आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी. याकडे आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. कोविड लसीकरणासाठी खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. तसेच व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी यासाठी मी केंद्राकडे आग्रह धरला आहे, असे बापट म्हणाले.
- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा काळ हा राजकारण करण्यासाठी नाही. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून मुकाबला केला पाहिजे. पण महाराष्ट्रात सत्तारुढ पक्ष अपयश झाकण्यासाठी राजकारण करीत आहेत. आम्ही सरकारला सहकार्य करीत आहोत. पण लोकांचे लक्ष वाझे प्रकरणावरून वळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.