MPSC students protest esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : 'सांग MPSC अजून काय करु.. म्हसोबाचं पाय धरु की मरीआईची सेवा करु'

संतोष कानडे

पुणेः एमपीएससी परीक्षेचा पॅटर्न बदला परंतु आम्हांला वेळ द्या, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील नवी पेठेमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. यातील एका आंदोलक विद्यार्थ्यांने एक कविता सादर केली. या कवितेतून त्याने थेट काळजात हात घातला. पुण्यात एमपीएससपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय सुरुय, ते या कवितेवरुन लक्षात येतं.

सांग MPSC अजून काय करु

सांग MPSC अजून काय करु...

म्हसोबाचं पाय धरु की मरीआईची सेवा करु

एमपीएससी तुझ्यासाठी दसरा सोडला, दिवाळी सोडली

नागपंचमीची मैनेला भेटायची शपथ मोडली

वर्षानुर्षे अभ्यास करण्याच्या नादात मैनेच्या बा नं मैनेची गाठ दुसऱ्याशी जोडली

सांग MPSC अजून काय करु...

अधिकारी व्हावं पोरगं म्हणून बा नं पुण्याला धाडलं

आईचं दागिनं, जमिनी गहाण ठेवून सावकाराचं कर्ज काढलं

इतक्यावर बाप माझा थांबला नाही... पंढरीची वारी बिरोबाला नवस करतोय

येईल माझा तहसीलदार, येईल माझा फौजदार म्हणून रोज झुरतोय

आई बिचारी भोळी.. सोमवार धरते शनिवार धरते

कधी-कधी तर नवरात्रीचं नऊ दिवस उपाशी राहाते

मागणी मात्र एकच.. आशा मात्र एकच- पोराला नोकरी लागण्याची

अन् वरमाई म्हणून पोराच्या लग्नात मिरवण्याची...

सांग MPSC अजून काय करु...

म्हसोबाचं पाय धरु की मरीआईची सेवा करु

हेही वाचाः ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

नवीन पॅटर्न 2025 ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शेवटच्या 2 संधी मिळतील. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे, ते 2025 साठी तयारी करतील परंतु पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. यासंदर्भात शासनाने विचार करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT