Pune accident esakal
महाराष्ट्र बातम्या

Navale Bridge Accident: ब्रेक फेल नव्हे, ड्रायव्हरची मस्ती नडली; नवले ब्रिज अपघाताचं कारण आलं समोर

सकाळ डिजिटल टीम

पुणेः काल रात्री पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क २४ वाहनांना चिरडले. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु याचं धक्कादायक कारण स्पष्ट झालेलं आहे.

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ अपघात झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना कंटेनरने अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घटनास्थळी जात पाहाणी केली. कंटनेनरचालक मनीलाल यादव याच्यावर गुन्हा दाखल झालेला असून तो फरार आहे. यादव हा मुळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

हा अपघात ब्रेक फेल झाल्याने घडल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता याबाबत स्पष्टता झालेली असून उतारावर गाडी न्यूट्रल करुन चालवल्याने अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उतारावर इंजिन बंद करुन ड्रायव्हरने गाडी चालवली. त्यामुळे ती कंट्रोल होऊ शकली नाही. ड्रायव्हरच्या या मस्तीमुळे १३ जण जखमी झालेत तर २४ वाहनांचं नुकसान झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT