Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

Pune Porsche Car Accident: पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अन्यथा...; संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलगा भरधाव वेगानं कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलगा भरधाव वेगानं कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता. या 'हिट अँड रन' प्रकरणामुळं सध्या पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण या भीषण अपघातानंतर आरोपीला दोन तासांतच जामीन मिळाला होता.

यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळं पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अशी मागणी त्यांनी केली आहे. (Pune Police Commissioner should be suspended says Sanjay Raut on Pune porsche car accident)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करायला हवं. त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. या भीषण अपघातात एक तरुण आणि तरुणी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. यानंतरही केवळ दोनच तासांत आरोपीला जामीन मंजूर झाला.

यानंतर जो व्हिडिओ समोर आला त्यात आरोपी मुलगा बारमध्ये बसून दारु पिताना दिसतो आहे. पण त्याचा मेडिकल रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे म्हणजेच त्यांनं मद्य सेवन केलेलं नाही, असं यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळं या प्रकरणात आरोपीला कोण मदत करतंय? हे पोलीस आयुक्त कोण आहेत? त्यांना तातडीनं पदावरुन हटवायला हवं अन्यथा पुणेकर रस्त्यावर उतरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT