TET Exam
TET Exam Team eSakal
महाराष्ट्र

तुकाराम सुपेच्या कार्यालयात सापडले ३३ लाख, तीन कोटींच्यावर कॅश हस्तगत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : टीईटी परीक्षा (TET Exam) घोटाळ्याचा व्याप आणखीन वाढत चालला आहे. आज शुक्रवारी (ता.२४) पुणे पोलिसांनी अटकेत असलेल्या राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या (Tukaram Supe) कार्यालयावर छापा टाकले असता ३३ लाख रुपये सापडले आहेत. आतापर्यंत तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम सुपे यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरुच आहे.(Pune Police Seized 33 Lakh Rupees From Tukaram Supe Office)

प्रकरण काय आहे ?

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०१८ च्या पराक्षेच्या निकालात गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेख डेरे व परीक्षा घेणाऱ्या जी.ए. साॅफ्टवेअरचे तत्कालीन व्यवस्थापक आश्विनकुमार यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. टीईटी निकालासाठी ५०० अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT