Bhagat Singh Koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

Video: संभाजीराजेंच्या संघटनेने पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते आक्रमक

संतोष कानडे

पुणेः पुण्यामध्ये राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या राज्यभरात निषेध होतोय.

एका कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज पुण्यामध्ये आलेले आहेत. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले.

यावेळी पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

दरम्यान, राजभवन येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. राज्यपाल भगत सिंह कोषयारी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजभवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राज्यपाल कोश्यारी यांचा यशदा या ठिकाणी एक कार्यक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT