Fraud Crime
महाराष्ट्र बातम्या

Pune News:इंस्टाग्रामवर डॉक्टर समजून प्रेमात पडली तरुणी, तो निघाला गवंडी आणि ३ लेकरांचा बाप

शहरातील एका उच्च शिक्षित तरुणीला एका भामट्याने सोशल मीडियावर डॉक्टर असल्याचे सांगत प्रेमाचे नाटक करून पैसे उकळले.

सकाळ डिजिटल टीम

Crime News Pune: शहरातील एका उच्च शिक्षित तरुणीला एका भामट्याने सोशल मीडियावर डॉक्टर असल्याचे सांगत प्रेमाचे नाटक करून पैसे उकळले. त्याचे बिंग फुटल्यावर पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून पोलिस भावाच्या नावे धमकावत असल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल झाली आहे.


पतीच्या अकाली निधनानंतर संबंधित तरुणी माहेरी राहत आहे. तिला एक मुलगी आहे. इन्स्टाग्रामवर तिची ओळख डॉ. सैफ खान याच्याशी झाली. नाशिक सिव्हिल रुग्णालयामध्ये नोकरीला असल्याचे सांगून त्याने तरुणीकडून प्रेमाची कबुली करून घेतली. तिच्या मुलीलाही सांभाळण्याची तयारी दाखविली.त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या.

दरम्यान, शिवाजीनगर परिसरात लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचे काम सुरु सध्या सुरू असून एका ग्रुपमध्ये डॉ. सैफ खान याचे छायाचित्र पाहिल्यावर मुलीने त्याला फोन केला. मला निवडणुकीचे काम दिल्याचे सांगून त्याने वेळ मारुन नेली. त्याचा पत्ता मिळवून इतरांकडून माहिती घेण्यात आली. त्यावेळी या भामट्याला तीन मुले असल्याचे आणि तो डॉक्टर नसून बांधकामांच्या ठिकाणी कामे करीत असल्याचे निष्पन्न झाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kirit Somaiya journalists clash : किरीट सोमय्यांची पत्रकारांना थेट दमदाटी, प्रश्न विचारताच भडकले; मुंबईतील घटनेने खळबळ

Pune Politics: खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते–भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पुण्यात तासभर चर्चा; भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update: माजी आमदार दिलीप मोहिते भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

Donald Trump: इराणला शस्त्र देणाऱ्या देशांना ५०% टॅरिफ लागणार; युरेनियम संवर्धन करणार नाही, सीजफायरनंतर ट्रम्प यांचा मोठा निर्णय!

अवैध मासेमारी करणाऱ्यांनो सावधान! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आता ड्रोनची नजर राहणार; सरकारचा नवा प्लॅन लागू

SCROLL FOR NEXT