Sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Pune News : मराठा समाजातील तरुणांनी आता उद्योगांकडे वळावे - शरद पवार

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचा समारोप शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचा समारोप शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

पुणे - मराठा तरुणांनी आता आरक्षणाकडून अर्थकारणाकडे गेले पाहिजे. अर्थकारण चांगले असेल तरच समाज सुधारू शकतो. यासाठी मराठा समाजातील तरुणांनी आता विविध उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता.२८) येथे दिला.

संभाजी ब्रिगेडचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचा समारोप शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते. या समारंभात पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. मा. म. देशमुख आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

पवार पुढे म्हणाले, ‘संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक चांगले चर्चासत्र झाले.या चर्चासत्रात उद्योग क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचा विषय हा आरक्षणाशिवाय उद्योगाकडे असा होता. संभाजी ब्रिगेडने हे चांगले काम हाती घेतले आहे. देश-विदेशात मी जातो, तेव्हा मला विविध देशांत अनेक मराठा तरुण-तरुणी भेटतात. तेव्हा अभिमान वाटतो. मराठा समाजातील मुलींनादेखील चांगले शिक्षण दिले पाहिजे.’

छत्रपती शाहू महाराज यांनी कायम शेतीला आणि उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन दिले. यासाठी शाहू महाराजांनी जयसिंगपूरची बाजारपेठ आणि कोल्हापुरात उद्यमनगरीची उभारणी केली. शाहू महाराजांनी कायम, शेती, जलसंधारण, शिक्षण, उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक एकता आणि समाज सुधारणांवर भर दिला. भारतीय राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आणि सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या मागे उभे राहण्याची सूचना केली. त्यामुळे आपण शाहू-फुले- आंबेडकर विचारांनी काम केले पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण लढा देत आहोत. आरक्षण मागणीचा हा लढा यापुढेही सुरु ठेऊ. आरक्षण आज मिळाले नाही तरी, पुढे जातच राहू. पण देशात सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बाजूला ठेऊन काम करू लागले आहेत. त्यांच्या या कृतीला आपण सर्वांनी मिळून रोखले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी आपली जबाबदारी मानून संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार यांचेही भाषण झाले.

‘यशस्वी उद्योगांची तीन उदाहरणे’

- इजिप्त दौऱ्यावर असताना कैरोजवळ नाईल नदीच्या किनारी शेतीसाठी पाणी उपसणाऱ्या इंजिनचा आवाज आला. त्याची माहिती घेतली तर ते कोल्हापूर येथील उद्योजकाने तयार केल्याचे समजले.

- अमेरिकेतील एका हॉटेलात नाष्टा करण्यासाठी गेलो. त्यावेळी तेथे वेटर म्हणून काम करणारी मुलगी ही इस्लामपूरची असल्याचे कळले आणि आनंद झाला.

- जगप्रसिद्ध ह्युंडाई कंपनीचा मालक चॉंग जू युंग हा वाहन चालक होता. त्याने चालक, नंतर ट्रकच्या चेसी रंगविणे, त्यानंतर त्या तयार करणे, असा प्रवास करत करत ह्युंडाई कंपनी स्थापन केली.

‘महिला संभाजी ब्रिगेड स्थापन करा’

संभाजी ब्रिगेडने आता महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान द्यावे. महिला-पुरुष समान आहेत. त्यामुळे संभाजी ब्रिगेडमध्ये महिलांसाठी निम्म्या जागा दिल्या पाहिजेत. यासाठी महिलांची स्वतंत्र संभाजी ब्रिगेड सुरु करावी, अशी सूचना पवार यांनी यावेळी प्रवीण गायकवाड यांना केली.

पुण्याचे नाव जिजाऊनगर करा - देशमुख

राजमाता जिजाऊ यांनी पुणे शहर वसविले आहे. त्यामुळे पुणे शहराचे नाव बदलून ते जिजाऊनगर करावे, अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT