Hit and Run Law Truck Drivers Strike esakal
महाराष्ट्र बातम्या

Hit and Run Law, Truck Drivers Strike ढिंग टांग : टरकसिंग दी कैफियत..!

क्रिकेटच्या मैदानात कोहलीसाब दा मुंडा विराट हिट अँड रन करतो, त्याला तुम्ही टाळ्या वाजवता!

सकाळ डिजिटल टीम

हिट अँड रनसाठी आम्हाला जी सजा फर्मावली जाणार आहे, तशीच ती पॉलिटिक्स आणि क्रिकेटमध्येही दिली जावी, ही आमची डिमांड आहे.

Hit and Run Law : ओ ये ओये! आज मी संपावर आहे. अधून मधून पंपावर जावे लागत असे, पण यावेळी संपावर पहिल्यांदाच गेलो. भलतेच चंगा वाटत आहे. चंगा म्हणजे चांगले याअर्थी! घाट उतरुन ढाब्यावर घटकाभर थांबल्यासारखे वाटत आहे. मी तसा खूप चंगा म्राठी बोलतो. म्राठी भाषा (Marathi language) मला खूप आवडते. महाराष्ट्रात (ट्रक घेऊन) गेलो की मी म्राठीतच बोलतो. उलट म्राठी लोकच हल्ली माझ्याशी उगाचच पंजाऽऽबीत (Punjabi language) बोलतात. त्यांना धड येत नाही, पण बोलतात!

परवा मी पुण्याला गाडी थांबवून कुठल्यातरी वडेवाल्यांकडे वडापाव खात होतो, तेव्हा सहजच ‘अर्जन वेल्लीनेऽऽ पैर जोड के गंडासी मारी...’ हे ‘ॲनिमल’ पिक्चरमधले गाणे गुणगुणत होतो. त्या वडेवाल्यांना का कुणास ठाऊक भयंकर राग आला. मला म्हणाले, ‘‘असली घाणेरडी गाणी इथं म्हणायची नाहीत, हा सभ्य लोकांचा वडापाव आहे...’ शेवटी मी त्यांना गंडासी म्हणजे पंजाबीत एक प्रकारची कुऱ्हाड असते, हे म्राठीत सांगितले. तेव्हा कुठे त्यांचा राग शांत झाला.

रहिंदा याने की असो. हे तर काहीच नाही, मक्के दी रोट्टी और सरसों दा साग पंजाबपेक्षा म्राठी ढाब्यांवर जास्त खपतो, आणि बेसन दा पिठलं और ज्वारी दी भाक्री पंजाब-हरयाणात जास्त पसंद केली जाते. चक दे फट्टे! परवा तर मी कोल्हापूरजवळच्या ढाब्यावर पिठलंभाक्री मागितली, त्याने आणून दिल्यावर ‘मी ओए, तेरे बिण मरजावां’ असे उद्रगार काढले. ढाब्याचा मालक मराठी होता. तो विनाकारण भडकला. त्याला वाटले मी त्यालाच ‘मरजावां’ असे म्हटले. हातापायी झाली असती, पण मीच त्याच्या हातापाया पडलो.

थोडक्यात, मला म्राठी उत्तम येते, आणि माननीय सरजी नितीनप्राजी गडकरीसाहेब मिनिस्टरजी झाल्यापासून आम्ही सगळेच ट्रकवाले मराठी शिकू लागलो आहोत. शिकावेच लागले बे!! चक दे फट्टे! ओए, लेकिण आम्हा ट्रकचालकांचे म्राठीतून तरी कोणी ऐकणार आहे की नाही? ‘ओजी मेरी गल सुण’ असे म्हटले तरीसुद्धा कुणी ऐकत नाही, याला काय अर्थय? शेवटी आम्हाला संप दा हत्त्यार उपसावे लागलेच. क्योंकी ‘हिट अँड रन’चा नवा जुलमी कानून सरकारने आणला आहे. ठोकर मारुन पळून जाणाऱ्या ट्रकवाल्याला दहा वर्षांची सजा आणि सात लाखाचा जुर्माना? यह तो सरासर नाइन्साफी सी...!!

अशाने आम्हा सगळ्याच ट्रकवाल्यांवर ‘ओय, ओय’ करायची पाळी येईल!! पण कीं करदां? कुणी सुणदेवास्ते तयार नैंदा... (हल्ली माझे मराठी सुधारले असले तरी सारखे सारखे महाराष्ट्रात यावे लागत असल्यामुळे पंजाबी बिघडले आहे. माफी चाहदां..!) आम्हा ट्रकवाल्यांना कोणी वालीच उरला नाही. आम्ही ट्रक चालवले नाहीत तर ढाबे कसे चालतील? पेट्रोल पंप कसे चालतील? नितीनपाजींनी (उनको मेरी उमर लग जाय...) रस्ते मस्त केले, पण अशा कानूनमुळे देशाच्या विकासाच्या वाटचालीत ॲव्हरेज मार खाईल!! ऐन घाटरस्त्याला मोसन कट होईल, टायर बसेल!!

क्रिकेटच्या मैदानात कोहलीसाब दा मुंडा विराट हिट अँड रन करतो, त्याला तुम्ही टाळ्या वाजवता! लीडर लोग पॉलिटिक्समध्ये धडाधड आरोप करुन पळून जातात, ती पण हिट अँड रनचीच केस होते ना? त्यांना मात्र माफी, आणि आम्ही गरीब बिचारे ट्रकवालेच भरडले जातो. हिट अँड रनसाठी आम्हाला जी सजा फर्मावली जाणार आहे, तशीच ती पॉलिटिक्स आणि क्रिकेटमध्येही दिली जावी, ही आमची डिमांड आहे. ती पूर्ण होईपर्यंत आम्ही ट्रक चालवणार नाही! चक दे फट्टे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

Ranveer Singh: सारा अर्जुनचा पहिला मोठा बॉलिवूड प्रोजेक्ट; रणवीरने सिंग केली तोंडभरून प्रशंसा

Acharya Devvrat : नैसर्गिक शेतीत नवनवे शोध लावणारे शेतकरी 'शास्त्रज्ञच'! राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार

Kalyan Politics कल्याण भाजपाच्या रडारवर ! 'डोंबिवली नंतर कल्याणात सर्जिकल स्ट्राईक'; शिंदे सेना-ठाकरे गटात खळबळ

SCROLL FOR NEXT