Punyashlok Ahilyadevi Holakar univercity, solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठाचा ३० जुलैला पदवीदान समारंभ! पद्मभूषण जे. बी. जोशींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ तर पद्मश्री प्रभूणेंना ‘डी.लिट.’; राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान, वाचा...

राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे ३० जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपालांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे ३० जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पदवीदान समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपालांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

विद्यापीठातर्फे ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना देखील निमंत्रित केले जाणार आहे. यावेळी अन्य विद्यार्थ्यांनाही पदवी देऊन गौरविले जाणार आहे.

पद्मभूषण जे. बी. जोशी यांच्याबद्दल थोडसं...

जे. बी. जोशी एक भारतीय रासायनिक अभियंता, अणुशास्त्रज्ञ, सल्लागार आणि प्राध्यापक आहेत. ‘मल्टीफेज रिॲक्टर्स’ आणि अणुभट्ट्यांच्या रचनेतील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी ते विशेष ओळखले जातात. ते सध्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई’चे कुलपती आहेत. त्यांनी ‘होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई’ येथे ‘डीएई-होमी भाभा चेअर प्रोफेसर’ म्हणूनही काम केले आहे. त्यांना अभियांत्रिकी विज्ञानातील योगदानासाठी ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार’ तसेच इतर अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. रासायनिक अभियांत्रिकी आणि अणुविज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०१४ मध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ देऊन गौरवण्यात आले आहे. यांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विशेष पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याबद्दल माहिती

गिरीश प्रभुणे यांना विद्यापीठातर्फे राज्यपालांच्या हस्ते ‘डी.लिट.’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. गिरीश प्रभुणे हे एक भारतीय सामाजिक कार्यकर्तेआहेत. त्यांनी विशेषतः भटक्या पारधी समाजाच्या आणि त्यांच्या मुलांच्या उत्थानासाठी प्रभुणे १९७० पासून काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना २०२१ मध्ये ‘सामाजिक कार्य श्रेणी’त ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘डी.लिट.’ दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT