milk 
महाराष्ट्र बातम्या

अतिरिक्त दुधाची  सरकारकडून खरेदी; आजपासून प्रारंभ

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात लॉकडाउनमुळे अतिरिक्त ठरणारे दूध राज्य सरकार आजपासून (ता. 6) खरेदी करणार आहे. हे दूध तालुका आणि जिल्हा सहकारी दूध संघांमार्फत खरेदी केले जाणार आहे. या संघांनी खरेदी केलेल्या अतिरिक्त दुधापासून पावडर निर्मिती करण्यासाठी आतापर्यंत चार खासगी प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती "महानंद'चे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी रविवारी सायंकाळी दिली. 

संबंधित सहकारी संघांनी खरेदी केलेले अतिरिक्त दूध निवड केलेल्या पावडर प्रकल्पांना देण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पांमध्ये गोकूळ, पराग, पारस आणि राजारामबापू आदींचा समावेश असून डायनामिक्‍सबरोबर चर्चा चालू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. राज्यात संचारबंदी लागू असल्याने दुधाच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी सहकारी दूध संघांनी मागणीवर आधारित खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील दूध शिल्लक राहू लागले. याचाच फायदा घेण्यासाठी खासगी दूध संघांनी खरेदी दर मोठ्या प्रमाणात कमी केले. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले. यावर मार्ग काढण्यासाठी राज्यातील अतिरिक्त 10 लाख लिटर दूध सरकारमार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार येत्या 31 मेपर्यंत प्रतिलिटर 25 रुपये दराने दूध खरेदी करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT