Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : महाविकास आघाडी हिरवे झेंडेवाल्यांबरोबर?उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल

`‘महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत आहे की गडकिल्ल्यांवर आक्रमण करीत हिरवे झेंडे नाचवणाऱ्या लोकांबरोबर हे जनतेला कळायला हवे,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : `‘महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत आहे की गडकिल्ल्यांवर आक्रमण करीत हिरवे झेंडे नाचवणाऱ्या लोकांबरोबर हे जनतेला कळायला हवे,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला काँग्रेस करत असलेल्या विरोधाबद्दल ते बोलत होते. ‘‘गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे दूर करायला हवीत, अशी शिवप्रेमींची मागणी आहे. शिवरायांच्या इतिहासावर आक्रमण होते आहे, ते कायद्याने नियमानुसार दूर करायला हवे, अशी सरकारची भावना आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करावे, यावर आमचा भर आहे,’’ असे फडणवीस म्हणाले.

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावे, या सातत्याने होणाऱ्या मागणीचा पाठपुरावा करीत गृहखात्याने या तक्रारींची दखल घेत महाराजांचा मान जपायला कारवाई सुरु केली. महाविकास आघाडीने या कारवाईला विरोध करणे अनाकलनीय आहे.

-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘विशाळगड दंगलप्रकरणी दोषींवर कारवाई करा’

‘‘विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलीसांनी दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिली. विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा,’’ अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.

‘‘विशाळगड दंगल प्रकरणी माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. महाराष्ट्रात झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचे हे कारस्थान दिसत आहे. राज्यात यापूर्वीही सामाजिक शांतता बिघडावी यासाठी दोन जाती धर्मात दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, यातून काही बोध घेतल्याचे दिसत नाही. विशाळगडाखालील मजापूर गावातील या घटनेत ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई द्यावी,’’ अशी मागणीही नसीम खान यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT