आज राज्यभरात आरोग्य विभागाच्या काही जागांसाठी परीक्षा पार पडल्या. मात्र परीक्षा होण्याआधीच याचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांनी या संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गट 'ड'च्या परिक्षेतील हा गलथान कारभार उघडकीस आल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
साधारण दुपारी 3:25 ला स्पर्धा परीक्षेच्या टेलिग्राम ग्रुपवर प्रश्नपत्रिका फिरत होती. याचा अर्थ पेपर 2 वा. किंवा त्या आधी सकाळीच फुटलेला असावा. फुटलेल्या प्रश्नपत्रिकेतील 92 प्रश्न हे मूळ प्रश्नपत्रिकेतील आहेत.
'न्यासा'च्या बेजबाबदार कारभाराचा फटका?
लोहमार्ग पोलीस भरती, आरोग्य विभाग भरतीची प्रक्रिया राबवण्यात न्यासा कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रशपत्रिका ठेवण्यासाठी कोषागार निश्चित करणे, सुरक्षा नेमण्यात न्यासा कुचकामी ठरल्याचं हे द्योतक आहे.
प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणे, सीलबंद पेट्या, सोबत सुरक्षा पुरवण्यात न्यासा कमी पडल्याचे याअधीच्या घटनांतून दिसले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट 'ड'ची भरती
राज्यातील सुमारे ४ लाख ३० हजार उमेदवारांनी गट 'ड'च्या जागेसाठी अर्ज केला होता. भंडारा जिल्ह्यातील केंद्रावर २५० विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक देण्यात आले नाही, तिथे उशीर झाला. मोहाडीसह काही केंद्रांवर सील नसलेल्या लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका आल्याचं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये प्रशपत्रिकेच्या झेरॉक्स विकल्या गेल्याचा उमेदवारांनी आरोप केला आहे. काही ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना वाढीव वेळ मिळाला नाही, असा आरोप होतोय. नांदेडमधील एका महिला उमेदवाराला प्रवेशपत्रातील केंद्र वेगळे आणि प्रत्यक्ष बैठक व्यवस्था दुसऱ्या केंद्रावर असल्याचं कळलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.