Teacher 
महाराष्ट्र बातम्या

हो; पण आम्ही शिकवायचं काय? शाळांतील शिक्षकांपुढे प्रश्‍न

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील २९ जिल्ह्यांतील नववी ते बारावीच्या शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या; पण शाळेत शिकवायचे काय, याबाबत शिक्षकांत संभ्रम आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने आत्तापर्यंत झालेल्या अभ्यासाची उजळणी घ्यावी की पुढील अभ्यासक्रम पूर्ण करावा, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संकटामुळे आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र ऑनलाइन आणि इंटरनेटची यंत्रणा नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला सरकारने मान्यता दिली. त्यानुसार २३ नोव्हेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळा सुरू झाल्या. मागील आठवड्यातील आकडेवारीनुसार राज्यातील ११ हजार ३२२ शाळांमधील वर्ग सुरू झाले आहेत; परंतु शाळा सुरू होऊन चौदा दिवस झाले तरी अद्याप शाळेत काय शिकवावे, याबाबत शिक्षक पेचात आहेत.

जून महिन्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात शाळा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू झाल्या आहेत.  दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या म्हणजे नेहमीच्या पद्धतीने प्रथम सत्र संपले आणि दुसरे सत्र सुरू झाले, असे समजून  त्याप्रमाणे शिकविले जात आहे; पण पहिल्या सत्राच्या समाप्तीबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या सत्राच्या मूल्यमापनावर विद्यार्थ्यांचा निकाल अवलंबून आहे. म्हणून नेमका कोणता अभ्यासक्रम शिकवणे अपेक्षित आहे, परीक्षेचे कामकाज काय अपेक्षित आहे, याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात आहेत.

सरकारने धोरण स्पष्ट करावे - गणपुले
दहावी आणि बारावीची परीक्षा वर्षभराच्या अभ्यासक्रमावर असते. त्यामुळे त्यांची अडचण नाही. अकरावी प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही. त्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यासही अवधी आहे. त्यामुळे सरकारने प्रत्यक्ष सुरू झालेल्या वर्गात काय शिकवावे, याचे धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ते व माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी केली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT