महाराष्ट्र बातम्या

विखेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई: काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाईल, हे आता सांगता येणार नाही. विखे गेल्यावर काँग्रेस आमदारांची संख्या किती राहील, त्यावरून पुढील निर्णय घेण्यात येईल. सर्वात जास्त सदस्य कुणाचे राहतील यावरही याबाबतची गणितं ठरणार आहेत, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेही जाऊ शकते, याबाबतचे संकते दिले आहेत. 

विरोधीपक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रसकडे गेले तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. तर काँग्रेसने हे पद राखल्यास स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे पद आपल्याकडे ठेऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विरोधी पक्षनतेपदाची जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारू असे म्हटले होते. म्हणून, त्यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे विखे आता 27 तारखेला काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नगरचे मतदान पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. गावी गावी ते समर्थकांच्या बैठका घेत आहेत. विखे पाटील हाच आमचा पक्ष असून ते जो आदेश देतील त्यानुसार काम करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT