Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: अजित पवार गटाच्या एन्ट्रीने विखेंना फटका! मंत्रिमंडळ समितीतून झाली गच्छंती

मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूलमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूलमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऐवजी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मंत्रीमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सांमत, अतुल सावे, दादा भुसे यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे.

अजित पवार गटामुळे मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून विखे पाटलांची गच्छंती झाल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमध्ये भाजपाकडून विखे पाटील होते. तर आता राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे विखे पाटलांना डच्चू मिळाला आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्यामुळे नाराजीचे सूर ऐकू येत होते. त्याचप्रमाणे आमच्या आधिकारांवर गदा येईल अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याची सुरूवात झाल्याच्या चर्चा सूरू आहेत. विखे पाटलांच्या जाण्याने अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT