Rahul Gadpale Shital Pawar Samrat Phadnis 
महाराष्ट्र बातम्या

राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍युरेटर; फडणीस पुण्याचे कन्टेंट क्‍युरेटर

सकाळवृत्तसेवा

पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी श्रीराम पवार आणि चीफ कन्टेंट क्‍युरेटरपदी (मुख्य संपादक) राहुल गडपाले यांची नियुक्ती झाली आहे. पुणे आवृत्तीच्या कन्टेंट क्‍युरेटरपदी (संपादक) सम्राट फडणीस आणि समूहाच्या एक्‍झिक्‍युटिव्ह कन्टेंट क्‍युरेटरपदी शीतल पवार यांची नियुक्ती झाली आहे. 

माहितीचा वेग आणि उपलब्धता, सोशल मीडियाचा विस्तार आणि मुद्रित माध्यमाची विश्वासार्हता या घटकांचा विचार करून समूहाने संपादकपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ केली आहे. माहितीची विश्वासार्हता या प्राथमिक घटकासोबत वाचकांना विविध माध्यमांद्वारे आणि सर्वंकष माहिती पुरविणे ही ‘क्‍युरेटर’ची जबाबदारी आता संपादकीय कामकाजाचा प्रमुख भाग राहील. 

श्रीराम पवार गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ समूहात विविध संपादकीय पदांवर कार्यरत आहेत. 

राहुल गडपाले सध्या ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत. विविध माध्यम समूहांमध्ये संपादकीय जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. राजकारण, शहरीकरण, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. 

सम्राट फडणीस ‘सकाळ’च्या डिजिटल माध्यमाचे निवासी संपादक आहेत. विद्यार्थी बातमीदार ते संपादक असा त्यांचा विविध माध्यम समूहांमधील प्रवास आहे. 
शीतल पवार संगणक अभियंता आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायसेन्स (टीआयएसएस) संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शहरीकरण, माध्यमे आणि राजकारण आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. 
गडपाले ‘सकाळ’ समूहाच्या सर्व आवृत्त्यांच्या संपादकीय समन्वयाची, मुख्य संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील. फडणीस पुणे आवृत्तीच्या संपादकीय समन्वयाची, संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT