Eknath Shinde News esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : राहुल गांधींनीच देशद्रोह केला, मुख्यमंत्री शिंदेंचा 'नेमका' प्रहार

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

सुरुवातीला बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याला विकासाकडे नेणारं बजेट मांडण्यात आलेलं आहे. अधिवेशनामध्ये लोकहिताचे निर्णय घेता आले, ही महत्त्वाची बाब आहे. विरोधी पक्षनेत्याकडे दोन पर्याय असतात. पहिला गडबड गोंधळ घालायचा आणि चर्चा बंद पाडायची. आणि दुसरा चर्चा घडवून आणून प्रश्न तडीस न्यायचे. मुळातमध्ये यावेळी सभागृह निट चाललं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षामध्ये दोन-चार दिवस अधिवेशन झालं होतं. परंतु या अधिवेशनात विविध विषयांना न्याय मिळाला. महिलांसाठी अनेक निर्णय अर्थसंकल्पामधून घेण्यात आले आहेत. शिवाय मांडण्यात आलेल्या सर्व विधेयकांवर चर्चा झाली. एकंदरीत हे अधिवेशन सर्व अंगाने यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधी यांच्याविषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींवर बोलण्याचा राहुल गांधींना अजिबात अधिकार नाही. राहुल यांनी मोदी आडनावावर बोलून सबंध ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. मोदीजी बारा महिने आणि २४ तास काम करत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी हे देशाबाहेर जावून देशाचा अपमान करत आहेत. हाच मुळात देशद्रोह आहे, असं म्हणून त्यांनी राहुल गांधींवर आरोप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT