Bharat Jodo Yatra rahul gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींनी सावरकरांची 'ती' चिठ्ठीच वाचून दाखवली; अकोल्यात माध्यमांशी संवाद

सकाळ डिजिटल टीम

अकोलाः मागील आठ वर्षांमध्ये भारतात भीती पसरवली जात आहेत. भाजप नेते देशातल्या शेतकऱ्यांशी आणि युवकांशी बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रश्न कळत नाहीत. म्हणून आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली. ही यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर, अशी जाणार आहे.

अकोला येथून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी देशाला रस्ता दाखवला. देशाला लढण्याची प्रेरणा गांधींनी दिली. त्यामुळे ही आजची लढाई समजून घेणं गरजेचं आहे. भाजपचा मीडियावर कंट्रोल आहे, न्यायव्यवस्थेवर आणि संस्थांवर दबाव आहे. आम्हांलादेखील संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही. म्हणूनच हा लढा स्वातंत्र्याचा असल्याचं गांधी म्हणाले.

या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी पत्रकारांना मराठीतून प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं. न समजलेले प्रश्न त्यांनी नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून समजून घेतले.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

महाराष्ट्रामध्ये २० पटसंख्येखालील शाळा बंद केल्या जात आहेत, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय पर्याय नाही.

राहुल गांधी यांनी सावरकरांची चिठ्ठी यावेळी वाचून दाखवली. ''सर मी आपला नौकर राहू इच्छितो'' हे चिठ्ठीतील वाक्य त्यांनी वाचून दाखवलं. सावरकरांनी इंग्रजांना ही चिठ्ठी भीतीपोटी लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी यात्रा रोखून तर दाखवा, असंही थेट आव्हान दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT