Rahul Narvekar on Bhalasaheb Thorat radhakrishna vikhe patil meeting ashok chavan Monsoon Session  
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : "तर नवीन प्रश्न..."; थोरात-विखे विधानसभेत भिडले; अध्यक्षांची कोपरखळी

रोहित कणसे

विधीमंडळाचे पावसाळी अधिवशेन सध्या सुरू आहे. आज (२ ऑगस्ट) वाळू लिलाववरून विधान सभेत सत्ताधारी आणि विरोधकमध्ये चर्चा झाल्याचे पाहायाला मिळाले. वाळू धोरणावरून विधीमंडळात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सध्याच्या शिंदे-फडणवीस-पवार सरकरामधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात प्रश्नोत्तराच्या फैरी झडल्या. यादरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मात्र या मुद्द्यावर काँग्रेसला कोपरखळी मारल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं झालं काय?

माजी महसूल मंत्री थोरातांनी वाळू-रेती लिलावबाबत सभागृहात अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान त्यांच्याच जिल्ह्यातीले सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देखील दिली. या प्रश्नांवर खूप वेळ दोघांचे प्रश्नोत्तर सुरू होती. शेवटी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात उठून अध्यक्षांना उद्देशून विखेंना एक थेट प्रश्न विचारला.

चव्हाणांचा प्रश्न अन् विखेंचं उत्तर..

अशोक चव्हाण म्हणाले की, हा प्रश्न सर्व महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वाळू संदर्भात अनेक वेळा सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. अध्यक्ष महोदय विद्यामन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आहेत आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही मातब्बर नेते आहेत. एकाच जिल्ह्यातील ते शेजारी आहेत. त्यामुळे इतरांना बोलवण्यापेक्षा आपण बाळासाहेब थोरातांना बोलवून, आपण दोघेच एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावाल का असा माझा प्रश्न राधाकृष्ण विखे यांना आहे.

अध्यक्ष काय म्हणाले?

यावर राधाकृष्ण विखेंनी देखील ही सूचना स्वागतार्ह असल्याचे म्हणत त्यांच्या विनंतीला मान दिला. मात्र त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे दोघे एकत्र बसले तर दुसरा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी कोपरखळी मारली, यावरू सभागृहात एकच हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT