Rahul Narvekar On NCP Office 
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narvekar On NCP Office : हिवाळी अधिवेशनात अजित पवार अन् शरद पवार गटाला एकच कार्यलय का? नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज पासून नागपूर येथे सुरू होत आहे.

रोहित कणसे

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज पासून नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट सहभागी होणार आहेत. दरम्यान या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून विधीमंडळात एकच कार्यलय देण्यात आलं आहे. यावरून वाद होण्यची शक्यता आहे. यादरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना एकच कार्यालय देण्याबाबत खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचं विधीमंडळ कार्यालय अजित पवार गटाचे असेल की शरद पवार गटाचे यावरून वाद सुरू आहे. याबद्दल विचारले असता नार्वेकर म्हणाले की, आपण विधिमंडळातील कामकाज सुरळीत करण्यासाठी कार्यलायाची जागा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधीमंडळ पक्षाला एक कार्यालय देण्यात आले आहे.

अद्याप माझ्याकडे कोणाकडूनही त्यांना वेगळा गट समजाला जावं असं निवेदन देण्यात आलं नाहीये. त्यामुळे असं निवेदन येत नाही तोपर्यंत माझ्यासमोर हा एकच गट आहे. तसं निवेदन आलं तर कायदेशीर बाबी तपासून योग्य निर्णय घेतला जाईल असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीचं काय? याबद्दल विचारलं असता नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या संदर्भातील माझ्याकडे आलेल्या याचिकांबाबत सर्वाना नोटीसा देऊन त्याची उत्तरे माझ्याकडे आले आहेत. त्यामुळे वेळेचा अंगाद घेऊन त्या प्रकरणात देखील सुनावणी सुरू करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर देखील लवकरच सुनावणी घेतली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT